पैठण व वैजापूर तालुक्यातील सरपंचपदाची आजची आरक्षण सोडत स्थगीत

0
489
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण व वैजापूर तालुक्यातील सरपंचपदाच्या आज होणाऱ्या आरक्षण सोडतीला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे. आता ही सोडत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पुढील आदेशानंतर घेतली जाणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत ८ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आली होती. त्यानुसार पैठण आणि वैजापूर तालुक्यातील  सरपंचपदाची आरक्षण सोडत घेण्यात आली होती. मात्र पैठण तालुक्यातील हिरडपुरी आणि पाचोड खुर्द या दोन ग्रामपंचायतींच्या आरक्षणामध्ये चुक झाल्याने त्यात दुरूस्ती करणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव पैठणच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता.

वैजापूर तालुक्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करताना नजरचुकीने सिरसगाव आणि बळहेगाव या दोन गावांचा समावेश झाल्यामुळे या आरक्षणात अंशतः बदल करण्याची परवानगी वैजापूरच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण आणि वैजापूर तालुक्यातील सरपंचपदाच्या  आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण राबवताना चुक झाल्यामुळे ही आरक्षण सोडत आज २९ जानेवारी रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र या प्रकरणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आल्यामुळे खंडपीठ पुढील आदेशापर्यंत या आरक्षण सोडतीला स्थगिती देण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी गुरूवारीच जारी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा