२३ नोव्हेंबरपासून उघडणार इयत्ता नववी ते १२ वीच्या शाळा?

0
589
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा उघडण्याबाबत दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असे संकते महाविकास आघाडी सरकारने आधीच दिले होते. आता दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून राज्यातील इयत्ता नववी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्याचा हालचाली सुरु असून तशी विनंती शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात इयत्ता १० वी आणि १२ वीची परीक्षा घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. एरवी या परीक्षा फेब्रुवारी- मार्च महिन्यातच होतात. परंतु सध्या तशी परिस्थिती नसल्यामुळे मे महिन्यात या परीक्षा घेण्याचा प्रयत्न आहे. या परीक्षांना आणखी उशीर झाला तर निकाल येण्यास विलंब होईल आणि पुढील शैक्षणिक प्रवेश घेताना विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तशी कल्पना दिली आहे. त्यामुळेच २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी, दहावी,अकरावी आणि बाराचीच्या शाळा सुरु कराव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

हेही वाचाः शाळांना दिवाळीच्या सुट्या, पण पाचच दिवस!

अकरावी प्रवेशाबाबत आज निर्णयः मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. रखडलेली ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याबाबत आज निर्णय होणे अपेक्षित आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची छोटेखानी बैठक झाली. या बैठकीतही याबाबत चर्चा झाली. याबाबत आज निर्णय झाला तर येणाऱ्या काळात कदाचित आम्ही प्रवेश प्रक्रिया सुरु करु शकू, असे गायकवाड म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा