शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, अहमदनगर जिल्ह्यात तब्बल २. ५ लाख लाभार्थी

0
408
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झालेल्या बाबुडी घुमट आणि विळद अशा दोन गावांना या कर्जमाफी योजनेचा लाभ तूर्तास मिळू शकलेला नाही.

 राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुसर्‍या यादीत अहमदनगर जिल्ह्यातील 2 लाख 52 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेली बाबुडी घुमट आणि विळद ही दोन गावे शेतकरी कर्जमाफी योजनेपासून तूर्त वंचित राहिले आहेत. या यादीत वर्धा जिल्ह्यातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश असून वर्धा जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत वर्धा जिल्ह्यातील दोन गावांतील 166 शेतकरी लाभार्थी ठरले होते. आज जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील 42 हजार 913 शेतकर्‍यांचा समावेश आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफीची रक्कम तातडीने मिळावी म्हणून पुढील प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. अहमदनगरच्या संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आधार प्रमाणिकरणाचा आज शुभारंभ करण्यात आला. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर पुढील 72 तासांत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होईल.

34 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ : राज्यातील सुमारे 34 लाख शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबवाजणी करण्यात येत असून याद्यांमध्ये अचूकता रहावी याची खबरदारी घेण्यात येत आहे.  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेंतर्गत आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकर्‍यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 15 हजार 358 शेतकर्‍यांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित करण्यात आली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा