सीरमची कोविशिल्ड लस केंद्र सरकारला २०० रुपयांत, किरकोळ किंमत मात्र १००० रुपये!

0
40
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः डीसीजीआयने भारतात सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिल्यानंतर आता सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी कोविशिल्ड लसीची किंमत जाहीर केली आहे. केंद्र सरकारला कोविशिल्ड लसीचा एक डोस २०० रुपयांत मिळणार आहे. मात्र किरकोळ बाजारात या लसीच्या एका डोजची किंमत १००० रुपये असणार आहे.

केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीची किरकोळ बाजारात विक्री करण्याची परवानगी दिली तर कोविशिल्ड लसीच्या एका डोजची किंमत १००० रुपये असेल. केंद्र सरकारला आपण हीच लस २०० रुपयांत देत आहोत. सीरम केंद्र सरकारला १० कोटी डोज देणार आहे, अशी माहिती अदर पुनावाला यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत दिली.

हेही वाचाः कोरोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते का?, डीसीजीआयने दिले असे स्पष्टीकरण…

आम्ही जे काही केंद्र सरकारला देणार आहोत, ते लोकांना मोफत दिले जाणार आहे. जेव्हा आम्ही खासगी बाजारात या लसीची विक्री करू तेव्हा मात्र कोविशिल्ड लसीच्या एका डोजची किंमत १००० रुपये असेल, हे मला स्पष्ट करायचे आहे, असे पुनावाला म्हणाले.

हेही वाचाः औरंगाबाद की संभाजीनगर?: अजितदादा म्हणाले तिढा सुटणार, आठवलेही भाजपच्या विरोधात

सध्या सीरमकडे कोविशिल्ड लसीचे पाच कोटी डोज तयार आहेत. पुढील सात ते दहा दिवसांत सर्व औपचारिकता पूर्ण करून आम्ही एका महिन्यात सात ते आठ कोटी लसींचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने लस निर्मिती करू, असे पुनावाला म्हणाले. आम्ही कोविशिल्ड लसीची निर्यात किंवा खासगी बाजारपेठेत विक्री करू शकत नाही. केंद्र सरकारने आम्हाला परवानगी दिली तरच ही लस खासगी बाजारपेठेत उपलब्ध असेल, असेही पुनावाला म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा