अकृषी विद्यापीठांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही लवकरच मिळणार ७ वा वेतन आयोग, प्रक्रिया सुरू

0
832
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: राज्यातील अकृषी विद्यापीठांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला असून कोरोना महामारीच्या कालावधीतील राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता संबंधित कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२० पासून प्रयत्न लाभ अनुज्ञेय करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना देण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, वेतननिश्चिती व इतर सेवाविषयक बाबींमध्ये लाभ पूर्ववत करण्यासाठी वित्त विभागाकडे कार्यवाही सुरू असल्याचे सामंत यांनी सोमवारी विधान परिषदेत सांगितले.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

राज्यातील अकृषी विद्यापीठांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रश्न आमदार सतीश चव्हाण, डॉ.रणजीत पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वीच कामबंद आंदोलन केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा