नागपूरः अश्लील चित्रफित दाखवत पतीचे हात खुर्चीला बांधून महिलेने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर शस्त्राने गळा चिरून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली.
लक्ष्मण रामलाल मलिक असे मृत ६५ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. स्वाती नरेंद्र पाचपोहोर ही त्याची पाचवी पत्नी होती. तर लक्ष्मण हा स्वातीचा दुसरा नवरा होता. कौटुंबिक कलहातून अनेक महिन्यांपासून हे दोघे विभक्त रहात होते. रजत संकुलाच्या एका सदनिकेत लक्ष्मण रहात होता. सोमवारी दुपारी स्वाती लक्ष्मणकडे आली. स्वातीने लक्ष्मणला अश्लील चित्रफित दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यासाठी पतीनचे हात खुर्चीला बांधले. शारिरीक संबंध करून झाल्यावर स्वातीने चाकूने लक्ष्मणचा गळा कापला आणि दुपारी ती रिक्षाने घरी निघून गेली. स्वाती आणि लक्ष्मण यांना सहा वर्षांचा एक मुलगाही आहे.
पोलिसांनी या प्रकरणी शंभराहून अधिक लोकांची चौकशी केली होती. परंतु स्वातीच्या जबाबात सत्यता दिसत नसल्याने पोलिसांनी तिची कसून चौकशी केल्यानंतर तिने हत्येची कबुली दिली आणि सत्य समोर आले. स्वातीने जे सांगितले ते ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. स्वातीने रजत संकुलात येण्यासाठी वापरलेल्या ओला कॅबच्या चालकाचाही पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.
स्वातीला तीन महिन्यांपूर्वी एक मुलगी झाली होती. त्यामुळे पती तिच्यावर संशय घेत होता. तिचे एका स्कूलबस चालकासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली होती. तेव्हापासून लक्ष्मण मुलाचा ताबा मागत होता. स्वातीने लक्ष्मणच्या निवृत्तीवेतन खात्याचे एटीएम कार्डही स्वतःकडे ठेवून घेतले होते. त्यातून दोघांमध्ये वाद होता. पोलिसांनी स्वातीला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.