शरद आणि लालूप्रसाद यादव २५ वर्षांनंतर साथ साथ, विरोधी पक्ष एकजुटीच्या दिशेने पहिले पाऊल

0
179
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः समाजवादी नेते शरद यादव यांनी अखेर त्यांच्या लोकतांत्रिक जनता दल या राजकीय पक्षाचे लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलामध्ये विलीनीकरण केले आहे. या विलीनीकरणाबरोबरच हे दोन वयोवृद्ध समाजवादी नेते तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र आले आहेत.

शरद यादव यांनी त्यांच्या राजकीय पक्षाच्या विलीनीकरणाची घोषणा केली. देशात भक्कम विरोधी पक्ष उभा करणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठीच आपण हे पाऊल उचलले आहे. विखुरलेला जनता दल आणि अशा समान विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी एकजूट झाले पाहिजे, असेही शरद यादव म्हणाले.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शरद यादव हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. रविवारी त्यांनी आपल्या लोकतांत्रिक जनता दलाचे राष्ट्रीय जनता दलात विलीनीकरण केल्याची घोषणा केली. सध्या सर्वांचे एकीकरण हाच आमचा प्राधान्यक्रम असून त्यानंतर एकजूट विरोधी पक्षाचे नेतृत्व कोण करेल, याबाबत विचार केला जाईल, असेही शरद यादव यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

तत्कालीन जनता दलाच्या विविध पक्ष-संघटनांना एकत्रित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आपण लोकतांत्रिक जनता दलाचे राष्ट्रीय जनता दलात विलीनीकरण केल्याचे शरद यादव यांनी म्हटले आहे. शरद यादव यांनी चार दिवसांपूर्वीच या विलीनीकरणाची घोषणा केली होती. आज प्रत्यक्ष विलीनीकरण करण्यात आले. विद्यमान राजकीय परिस्थिती पाहता जनता परिवाराची एकजूट करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून हा पुढाकार आहे, असेही शरद यादव म्हणाले.

हेही वाचाः डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या ‘गुणवत्तेच्या आधारे’ निवड झाल्याच्या दाव्यातही खोटच, ही वाचा वस्तुस्थिती…

एकेकाळी देशात जनता दल हा भक्कम राजकीय पक्ष होता. १९८९ मध्ये जनता दलाकडे लोकसभेचे १४३ खासदार होते. देशात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा महत्वाचा निर्णय जनता दल सरकारच्या काळातच घेण्यात आला. त्यानंतर जनता दलाने विविध राज्यांतील सरकारच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. परंतु नंतरच्या काळात जनता दलात फूट पडली आणि जनता दलाचे अनेक तुकडे झाले.

चला उद्योजक बनाः  स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

शरद यादव यांनी २०१८ मध्ये पहिल्यांदा लोकतांत्रिक जनता दलाची स्थापना केली होती. आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केल्यानंतरही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मधेपुरा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ते या निवडणुकीत पराभूत झाले होते. शरद यादव हे लालूप्रसाद यादव यांच्यापासून विभक्त होऊन जवळपास २५ वर्षे झाली आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा