प्रजासत्ताकदिनापासून शिवभोजन थाळी योजनेची संपूर्ण राज्यभरात अंमलबजावणी

0
156
छायाचित्र सौजन्य: @CMOMaharashtra

मुंबईः राज्यातील गोरगरिबांना फक्त दहा रुपयांत जेवणाची थाळी उपलब्ध करून देण्याच्या शिवभोजन योजनेची येत्या 26 जानेवारीपासून राज्यभरात अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी दिले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज शिवभोजन थाळी योजनेचा आढावा घेतल्यानंतर हे निर्देश दिले आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री ठाकरे यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर प्रायोगिकतत्वावर राज्यात 50 ठिकाणी या योजनेच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. तसाठी 6 कोटी 48 लाख रुपये खर्चालाही मान्यता देण्यात आली होती. तसा शासनादेशही जारी करण्यात आला होता. मात्र आता या योजनेची अंमलबजावणी प्रायोगिकतत्वाऐवजी संपूर्ण राज्यभरात प्रजासत्ताकदिनापासून करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा