Exclusive : शिवसेना लढवणार विधानसभेच्या या 124 जागा, भाजपच्या कोट्यातून दोन एमएलसी

0
611
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : महायुतीची घोषणा करताना शिवसेना – भाजपने विधानसभा निवडणुकीत कोण किती व कोणत्या जागा लढवणार हे जाहीर केले नसले तरी न्यूजटाऊनच्या हाती लागलेल्या यादीनुसार शिवसेना विधानसभेच्या 124 जागाच लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित 164 जागा भाजप आणि मित्रपक्ष  लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात भाजपच्या कोट्यातून शिवसेनेला विधान परिषदेच्या दोन जागा देण्यावरही दोघांची सहमती झाली आहे.

शिवसेना लढवणार असलेले 124 मतदारसंघ असे :

मराठवाडा : औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम ( अजा राखीव), पैठण, वैजापूर, बीड, लातूर ग्रामीण, उमरगा ( अजा राखीव), उस्मानाबाद, परांडा, करमाळा, देगलूर ( अजा राखीव), वसतम, कळमनुरी, परभणी, गंगाखेड, घनसावंगी, जालना, सिल्लोड, कन्नड, हदगाव- हिमायतनगर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा.

विदर्भ : बुलढाणा, सिंदखेड राजा, मेहकर ( अजा राखीव), बाळापूर, रिसोड, बडनेरा, तिवसा, अचलपूर, देवळी, ब्रह्मपुरी, वरोरा, दिग्रस.

उत्तर महाराष्ट्र : कळवण ( अज राखीव), येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी ( अज राखीव),  देवळाली ( अजा राखीव), इगतपुरी ( अज राखीव).अक्कलकुवा (अज राखीव), धुळे शहर, चोपडा (अज राखीव), जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा,

मुंबई- ठाणे विभाग : पालघर (अज राखीव), भोईसर ( अज राखीव), नालासोपारा, वसई, भिवंडी ग्रामीण ( अज राखीव),  शहापूर (अज राखीव), भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ ( अजा राखीव), कल्याण ग्रामीण, ओवळा-माजीवडा, कोपरी- पाचपाखाडी, मुंब्रा-कळवा, मागोठणे, विक्रोळी, भांडुप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, चांदिवली, मानखुर्द- शिवाजी नगर, अणुशक्ती नगर, चेंबूर, कुर्ला ( अजा राखीव), कलीना, वांद्रे पूर्व, धारावी ( अजा राखीव),  माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मुंबादेवी.

कोकण विभाग : कर्जत, उरण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, सावंतवाडी,

पश्चिम महाराष्ट्र : जुन्नर, आंबेगाव, खेड- आळंदी, पुरंदर, भोर, पिंपरी ( अजा राखीव), संगमनेर, श्रीरामपूर (अजा राखीव), पारनेर, अहमदनगर शहर, माढा, बार्शी, मोहोळ (अजा राखीव), सोलापूर शहर मध्य, सांगोले, कोरेगाव, कराड उत्तर, पाटण, चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले ( अजा राखीव), शिरोळ, इस्लामपूर, पळूस- कडेगाव, खानापूर, तासगाव- कवठेमहांकाळ.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा