शिवसेनेकडून भाजपची ‘मोहम्मद घोरी’शी तुलना, विश्वासघात आणि कृतघ्नपणा केल्याचा ठपका!

0
86
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ‘हिंदुस्थानातील मुस्लिम सत्तेचा संस्थापक म्हटला जाणारा आक्रमक मोहम्मद घोरीचा त्यावेळचे पराक्रमी हिंदू राजे पृथ्वीराज चौहान यांनी 17 युद्धांत पराभव करूनही चौहानांनी मोहम्मद घोरीला प्रत्येकवेळी जीवदान देऊन सोडून दिले. पुढे हीच चूक त्यांना महागात पडली. शेवटच्या युद्धात मोठी तयारी करून आलेल्या मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला. त्यांनी वेळोवेळी दिलेली जीवनदाने विसरून घोरीने कृतघ्नपणा केला. पृथ्वीराज चौहान यांना अटक केली. त्यांचे हालहाल केले. महाराष्ट्रातही आम्ही अशा विश्वासघातकी आणि कृतघ्न प्रवृत्तीला अनेकदा जीवदान दिले. आज हीच प्रवृत्ती शिवसेनेवर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करत आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला. हिंमत असेल तर अंगावर या, आम्ही तयार आहोत, असे खुले आव्हानही शिवसेनेने भाजपला दिले आहे.

हेही वाचाः राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडूनच सरकार स्थापनेसाठी भाजपला थेट मदत : न्या. पी.बी. सावंत

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या तिढ्यामुळे शिवसेना- भाजपची 30 वर्षे जुनी युती संपुष्टात आली. भाजपने शिवसेनेला एनडीएतून काढून टाकले आणि संसदेत त्यांच्या खासदारांना विरोधी पक्षाच्या बाकावर बसवले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपची 12 व्या शतकातील मुस्लिम शासक मोहम्मद घोरीशी तुलना करत हल्लाबोल केला आहे. ‘सारा देश बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करत असतानाच ज्यांनी एनडीएची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा या मंडळींनी केली. ज्या एनडीएचे अस्तित्व मागच्या साडेपाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट केले, त्या एनडीएतून म्हणे शिवसेनेला बाहेर काढले. अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची ही सुरूवात आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राशी घेतलेला हा पंगा तुमचा तंबू उखडून टाकशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात एक तर उठत नाही, उठला की बसत नाही. पैसा व सत्तेचा माज शिवरायांच्या मातीत चालत नाही, याचा अनुभव कालच्या विधानसभा निवडणुकीत आलाच आहे.’ असे शिवसेनेने म्हटले आहे.

हेही वाचाःशिवसेनेला पाठिंबा किंवा सरकार स्थापनेबाबत चर्चाच नाहीः पवारांच्या गुगलीने सारेच बुचकळ्यात!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा