तुमच्या नावातील ‘अ’ निघाले तर फक्त ‘मृता’ उरेल: अमृता फडणवीसांवर नीलम गोऱ्हेंचा घणाघात!

0
54
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केल्यामुळे शिवसेना- भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगले असून आपल्या नावात ‘अ’चे महत्व आहे. ते निघाले तर ‘मृता’ उरेल. तुम्ही शिवसेनेची काळजी न करता स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपा, असा घणाघाती हल्ला शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. निलम गोऱ्हे यांनी केला आहे.

 अमृता या शब्दातील ‘अ’चे भान महत्वाचे आहे. अमृताताई आपण दिपावलीच्या दिवसांत अंमगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही. आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका. मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, म्हणजे मनःस्वास्थ्य चांगले राहते. आपल्या नावात ‘अ’चे महत्व आहे आणि ते निघाले तर ‘मृता’ उरेल. ‘अ’मंगल विचार मनात आणणे ‘अ’योग्य बरे का, अशा खोचक शब्दांत गोऱ्हे यांनी अमृता फडणवीसांना सुनावले आहे.

 रुग्णवाहिका आणि अंतिम शववाहिनीच्या वेळी शिवसेनाच सगळ्यात आधी आठवते, हे देखील आज विसरु नका, असा टोला लगावतानाच दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो, अशा खोचक शुभेच्छाही डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.  याआधीही गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांच्या टिकेला उत्तर देताना ‘रश्मी ठाकरे कधीही गाणे म्हणणे, चेहरा बदलणे आणि वेगवेगळी विधाने करणे यामध्ये पडल्या नाहीत,’ असा टोला लगावला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा