‘देशाच्या संरक्षणमंत्र्यांना ‘मर्चंट नेव्ही’ आणि ‘इंडियन नेव्ही’मधला फरकही कळत नाही’

0
15

मुंबईः आक्षेपार्ह कार्टून फॉर्वर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी एका व्यक्तीला मारहाण केली होती. ती व्यक्ती भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी असल्याचे सांगत भाजपने राज्य सरकारवर कडाडून टिका केली होती. मात्र ती व्यक्ती भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी नसून मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होती, असा दावा करण्यात येत आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सडकून टीका केली आहे. देशाच्या संरक्षणमंत्र्यालाच मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्हीमधील फरक लक्षात येईना झाला आहे. देशाला असा कसा संरक्षणमंत्री मिळाला?, असा सवाल राऊतांनी केला आहे.

मुंबईतील एका व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअपवर फॉर्वर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. भाजपने हा मुद्दा लावून धरत शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. मदन शर्मा असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शर्मा यांना झालेली मारहाण हा राज्यपुरस्कृत दहशतवाद असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. माजी नौदल अधिकाऱ्यांना माराहण झालेली खपवून घेणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते. राजनाथ सिंह यांनी मदन शर्मा यांच्याशी फोनवरून चर्चा करून विचारपूसही केली होती.

त्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावरच टिकास्त्र सोडले आहे. देशाच्या संरक्षणमंत्र्यालाच मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्हीमधील फरक लक्षात येईनासा झाला आहे. देशाला असा कसा संरक्षणमंत्री मिळाला?,  असा सवाल राऊत यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा