माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवलाः ईडीच्या नोटिशीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

0
108
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पाठवलेल्या नोटिशीवरून सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असतानाच संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ईडीची नोटीस भाजपच्या कार्यालयात अडकली असेल. माझा माणूस मी भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे, असे राऊत म्हणाले.

राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस पाठवल्याच्या बातम्या झळकल्यानंतर काही वेळातच ‘आ देखे जरा किसमें कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया’ असे ट्विट करत संजय राऊतांनी ईडीच्या कारवाईला आव्हान दिले होते आणि या कारवाईवरून ते आक्रमक भूमिकेत येतील, असे संकेतही दिले होते.

हेही वाचाः आ देखे जरा किसमें कितना है दम…. ईडीच्या नोटिशीविरुद्ध संजय राऊतांनी थोपटले दंड!

आज पत्रकारांनी राऊतांनी गाठले असता ‘मी काहीही सांगत नसून सगळे भाजपचे लोक सांगत आहेत. भाजपचे लोक मला ईडीची नोटीस आल्याचे सांगत आहेत. कालपासून पहातोय अजून कोणी आलेले नाही. मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तेथे नोटीस अडकली असेल. तेथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल… तर पाहून घेऊ,’ असे म्हणत राऊतांनी भाजपवर टिकास्त्र सोडले.

हेही वाचाः शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस

मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार आहे. हे सगळे राजकारण असून ज्यांना ते करायचे आहे, ते करू शकतात, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून काही जणांची चौकशी सुरु आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यात काही प्रकारचे व्यवहार झाल्याचे ईडीला आढळून आले आहे. त्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस बजावल्याचे सांगण्यात येते. ईडीने मंगळवारी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा