प्यार किया तो डरना क्या… म्हणत धनंजय मुंडेंची शिवसेना मंत्री सत्तारांकडून पाठराखण

0
1527
संग्रहित छायाचित्र.

जालनाः एका महिलेने केलेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची शिवसेनेने पाठराखण केली आहे. प्यार किया तो डरना क्या, असे म्हणत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार हे मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

 ज्या महिलेने मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत, त्या महिलेबाबत मुंडे यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांचे संबंध दोघांच्या सहमतीनेच झाले आहेत…. प्यार किया तो डरना क्या, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

 दिवंग भाजप नेते गोपीनाथ मुंडेही अशाच वादात अडकल्यानंतर खुद्द शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जब प्यार किया तो डरना क्या… म्हणत गोपीनाथ मुंडेंची पाठकारण केली होती. अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे यांच्या वादातही प्रतिक्रिया देताना बाळासाहेबांच्या त्याच वाक्याची आठवण करून दिली.

धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात दोन पत्नी आणि मुलांची माहिती लवपल्याचा आरोप करत भाजप नेते किरिट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यावर बोलताना सत्तार म्हणाले की, भाजपच्या अनेक नेत्यांनीही निवडणूक शपथपत्रात माहिती लपवली आहे. माहिती लपवणाऱ्या भाजप नेत्यांची नावे आपण लवकरच जाहीर करू, असा इशाराही सत्तार यांनी दिला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही भाजपने दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा