परतीचा पाऊस कितीही म्हणू द्या मी पुन्हा येईन, तुम्ही मात्र आत्महत्या करू नका : उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना दिलासा

0
125

औरंगाबाद: परतीच्या पावसामुळे घायकुतीला आलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पोहोचल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे नेतेही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी शेतकऱ्यांना धीर देताना परतीचा पाऊस कितीही म्हणू द्या, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पण तुम्ही मात्र आत्महत्या करू नका, शिवसेना शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढायला सदैव तत्पर राहील,असा शब्द देतानाच आत्महत्या करू नका, असे वचनही शेतकऱ्यांकडून घेतले. वैजापुरातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी साधलेल्या संवादाचा पहा व्हिडीओ….

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा