इंडेनच्या गॅस सिलिंडर बुकिंगसाठी देशभरासाठी एकच नंबर,‘या’ नंबरवर करा रिफिल बुकिंग

0
124
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: सणासुदीच्या दिवसात देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी इंडियन ऑइलतर्फे आणखी एक पुढाकार घेत इंडेन घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगसाठी देशभरासाठी एकच नंबर जारी केला आहे. आता ग्राहक 7718955555 या नंबरवर गॅस सिलिंडर बूक करू शकतील. ग्राहकांसाठी ही सुविधा चोवीस तास उपलब्ध असेल. १ नोव्हेंबरपासून याच क्रमांकावर ग्राहकांना रिफिल बुकिंग करावे लागणार आहे.

या क्रमांकावर एसएमस किंवा आयव्हीआरएसच्या माध्यमाने एलपीजी सिलिंडर बूक करता येऊ शकेल. ग्राहकांसाठी ही मोठीच सोय झाली असून इंडेन एलपीजी रिफील सिलिंडर बुक करणे आता अधिक सोपे आणि सोयीचे झाले आहे. ग्राहक कोणत्याही राज्यात किंवा टेलिकॉम सर्कल मध्ये असले तरी त्यांचा इंडेन रिफील बुकिंग नंबर हा तोच राहणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेली वेग-वेगळ्या टेलिकॉम सर्कलसाठी वेगळ्या इंडेन रिफिल बुकिंग नंबरची योजना  ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी एलपीजी सिलिंडर रिफील बुकिंगसाठी एकच नंबर 7718955555 हा असेल.

ग्राहक केवळ त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरवरून इंडेन एलपीजी सिलिंडर रिफील बुक करू शकतात. सिलिंडर बुक करण्याची सुधारित पद्धती आणि मोबाइल नोंदणी खालील प्रमाणे आहे.

अशी आहे नवीन पद्धतः

  • जर ग्राहकांचा मोबाइल नंबर इंडेन रेकॉर्डमध्ये आधीच नोंदणी केलेला असेल तर आयव्हीआरएसद्वारा एक १६ अंकी ग्राहक ओळख क्रमांक मिळेल. हा १६ अंकी ग्राहक ओळख क्रमांक ग्राहकांच्या इंडेन एलपीजी बिल/ इन्व्हॉइस/ कॅश मेमो / सबस्क्रिप्शन व्हाऊचरवर नोंदला असेल याची दखल घ्यावी. ग्राहकांनी हे निश्चित केल्यावरच रिफिल बुकिंग स्वीकारले जाईल.
  • जर ग्राहकांचा मोबाइल नंबर इंडेन रेकॉर्डमध्ये नसेल तर त्यांनी त्यांचा ७ आकड्याने सुरु होणारा १६ -अंकी ग्राहक ओळख क्रमांक टाकून वनटाईम रजिस्ट्रेशन द्वारे मोबाइल नोंदणी करून घ्यावा. या सोबतच त्याच आयव्हीआरएस कॉलवर त्याचे अधिप्रमाणन करून घ्यावे. हे केल्यानंतर ग्राहकांचा मोबाइल नंबर नोंदणी केल्या जाईल आणि एलपीजी रिफील बुकिंग स्वीकार होईल. हा १६ अंकी ग्राहक ओळख क्रमांक ग्राहकांच्या इंडेन एलपीजी बिल/ इन्व्हॉइस/ कॅश मेमो / सबस्क्रिप्शन व्हाऊचवर नोंदला असेल.

इंडेन एलपीजीच्या अधिक माहितीसाठी https://cx.indianoil.in या संकेत स्थळाला भेट द्या किंवा IndianOil ONE mobile app डाउनलोड करून घ्या, असे आवाहन इंडियन ऑइलच्या पश्चिम क्षेत्रच्या सरव्यवस्थापक (कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स) अंजली भावे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा