नांदेड जिल्ह्यात सहावीत शिकणाऱ्या चिमुरडीवर चार नराधम शिक्षकांचा बलात्कार,माणुसकीला काळीमा

0
493
प्रतीकात्मक छायाचित्र.

नांदेडः निभर्या सामूहिक बलात्कार प्रकरण चर्चेत असतानाच नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील चार नराधम शिक्षकांनी सहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.

 नांदेडपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या बिलोली तालुक्यातील साईबाबा विद्यालयात ही पीडित विद्यार्थिनी शिकते. चार नराधम शिक्षकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करत तिला अश्‍लील व्हिडीओ दाखवले. या नराधमांच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. पीडितेवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 घडलेला प्रकार पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी पीडितेच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना विश्‍वासात घेतले त्यानंतर प्रदीप पाटील, धनंजय शेळके, दयानंद राजुर आणि सय्यद रसूल या चार नराधम शिक्षकांविरुद्ध पॉक्सो कायदा आणि कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे चारही शिक्षक फरार झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा