धनंजय मुंडेंना तीव्र पोटदुखीचा त्रास, लीलावती रुग्णालयात दाखल

0
149
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीच्या त्रासाने ग्रासले असून त्यामुळे उपचारासाठी ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

धनंजय मुंडे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनावर यशस्वीपणे मात करून ते पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रीयही झाले होते. आता त्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते त्रस्त असून उपचारासाठी ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. ही माहिती मुंडे यांनी स्वतःच ट्विट करून दिली आहे.

तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच आपल्या सेवेत पुन्हा दाखल होईल, असे मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा