आयपीएस-आयएएस अधिकारी आधी फडणवीसांची भेट घेतात, मग मंत्र्यांवर आरोप करतातः मलिक

0
253
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भाजपकडून बेछूट आरोप करण्यात येत आहेत. हे आरोप करण्याआधी काही आयपीएस आणि आयएएस अधिकारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. त्यानंतर मंत्र्यांवर आरोप केले जातात, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

कोणत्याही मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकारी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात. हे नियोजित कटकारस्थान असून ते योग्यवेळी उघड करू. काही अधिकारी सरकारवर आरोप करत आहेत. आरोप करण्यापूर्वी त्यांच्या फडणवीसांसोबत बैठका झाल्या आहेत. आरोप करण्यापूर्वी कोणते अधिकारी आणि विरोधी पक्षनेते कुठे भेटले आणि कसे भेटले? याची योग्यवेळी माहिती देऊ. फडणवीस आणि केंद्रीय नेत्यांसोबत बैठका झाल्यानंतर आरोपांची मालिका सुरू झाली आहे, असा दावाही मलिक यांनी केला आहे.

हेही वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

भाजपकडून केंद्रातील सत्तेचा गैरवापर सुरू आहे. काही आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांना हाताशी धरून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कटकारस्थान करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला. मलिक यांच्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

भाजपचे हे षडयंत्र केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही, अशा राज्यांमध्ये केंद्र सरकार अशाच प्रकारचे षडयंत्र रचत आहे. आघाडी सरकारमधील नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार संजय राऊत, खासदार भावना गवळी या सर्व नेत्यांना राजकीय हेतूनेच अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे. विनाकारण कोणत्याही राजकीय नेत्यांना आणि राजकीय पक्षांना ठरवून टार्गेट करणे सुरूच राहिले तर जनताच त्यांना उत्तर देईल. पश्चिम बंगाल निवडणुकीत हेच दिसून आले आहे, असेही मलिक म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा