सकाळी गंभीर आरोप, सायंकाळी लग्न; भाजप खासदार तडसांच्या कुटुंबातील वादाला ट्विस्ट

0
646
छायाचित्रः सोशल मीडिया

वर्धाः वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस कुटुंबाकडून जीवाला धोका असल्याचा आरोप त्यांच्या सुनेने केल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले होते. काल बुधवारी पूजाचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विट केल्यानंतर सायंकाळी या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. खासदार तडस यांचा मुलगा पंकज याने अखेर सायंकाळी पूजाशी वैदिक पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नाची नगरपालिकेत रितसर नोंदही करण्यात आली आहे. पूजाने केलेल्या गंभीर आरोपानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अखेर या वादावर पडदा पडला आहे.

रुपाली चाकणकर यांनी पूजाचा व्हिडीओ ट्विट केला होता. १२ सेकंदाच्या या व्हिडीओत पूजाने तडस कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. ‘मी पूजा. रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय. माझ्या जीवाला धोका आहे इथे. मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला, अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतेय’, असे पूजा या व्हिडीओत सांगत होती.

हेही वाचाः  चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 हा व्हिडीओ ट्विट करत रुपाली चाकणकर यांनी तडस कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. वर्धा भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून यांना गेली अनेक दिवस तडस कुटुंब मारहाण करून अत्याचार करत आहे. पूजाचा व्हिडीओ आताच हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला. तातडीने पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलिस संरक्षणासाठी पोहोचले आहेत, असे चाकणकर यांनी म्हटले होते.

 चाकणकर यांच्या ट्विटनंतर एकच खळबळ उडाली. खासदार रामदास तडस यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना आमचे राजकारण कसे संपवायचे या दृष्टीने विरोधी पक्ष प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. सायंकाळ होता होता पंकजने पूजाशी वैदिक पद्धतीने लग्न केले. नगरपालिकेत जाऊन त्या लग्नाची रितसर नोंदही केली. या दोघांचे आधी नोंदणी पद्धतीने लग्न झाले होते. परंतु चाकणकर यांनी व्हिडीओ ट्विट केल्यानंतर या दोघांनी सायंकाळी घरातच साध्या पद्धतीने लग्न केले. पूजा आणि पंकजच्या लग्नाबरोबरच तडस कुटुंबातील वादावर पडदा पडला आहे.

काही लोकांनी राजकीय सुपाऱ्या घेऊन आम्हाला बदनाम केल्याचा आरोप लग्नानंतर केला. त्याला चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. भाजप सारखी राजकीय सुपाऱ्या घेण्याची आम्हाला सवय नाही. भाजपच्या महिला पदाधिकारी अशा प्रकारचे षडयंत्र रचत असतील. आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आहोत. ते आमचे संस्कार नाहीत. ते भाजपचेच संस्कार आहेत, असे चाकणकर म्हणाल्या. पूजाने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारा व्हिडीओ व्हायरल केला म्हणून पंकजला पूजाशी लग्न करावे लागले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा