केरळमध्ये मान्सून वेळेआधीच पोहोचणार, अंदमान निकोबार बेटावर बरसल्या मान्सूनच्या सरी!

0
127
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे केरळमध्ये वेळेआधीच मान्सून हजेरी लावेल, हा अंदाज खरा ठरताना दिसू लागला आहे. अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सूनच्या सरी बसरल्यामुळे केरळच्या किनारपट्टीवर ३१ मे रोजी मान्सूनच्या ढगांची गर्दी दाटेल असे हवामान खात्याने म्हटले आहे.

यंदा केरळमध्ये वेळेआधीच मान्सून येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आज अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सूनच्या सरी कोसळल्यामुळे हा अंदाज खरा ठरताना दिसू लागला आहे. अंदमान आणि निकोबार बेटावर सरी कोसळल्यानंतर सात दिवसांत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचतो.

पॅसिफिक आणि हिंदी महासागरामध्ये होणाऱ्या अनुकुल बदलांमुळे भारतात यंदा मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यंदा सरासरीच्या ९८ टक्के म्हणजेच समाधानकारक पाऊस पडेल, असे हवामान खात्याचा अंदाज आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा