डॉ. गेल ऑम्व्हेट असण्याचा अर्थ काय होता?

0
137
संग्रहित छायाचित्र.

भारतामध्ये ‘अस्मितेच्या ओळखीच्या राजकारणाचा’ जेवढा विस्तार झाला आहे आणि अस्मितेच्या राजकारणाचे जे तानेबाने आहेत, त्याबद्दलचे गंभीर चर्चा विश्व उभे करण्यात डॉक्टर गेल यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. डॉ गेल १९८० नंतर वर्ग विश्लेषणाकडून जात विश्लेषणाकडे येतात. ‘मानवी समाजाची समज येणे व त्यावर परिणाम करणे या साठी मार्क्सवाद हे एक अत्यंत अचूक तत्त्वज्ञान आहे’, अशी त्यांची भूमिका होती. १९८० नंतर त्या ‘वर्ग’ विश्लेषणाकडून ‘ जात’विश्लेषणाकडे जातातच पण त्याशिवाय त्यासाठीचा सैद्धांतिक मार्गही निर्माण करत तो अधिक प्रशस्त करतात. जातीचे विश्लेषण करण्यासाठी त्यांना आंबेडकरवाद महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण वाटतो.

केशव वाघमारे, पुणे

भारताच्याच नव्हे तर, जागतिक समाजशास्त्रात मूलभूत असे बौद्धिक योगदान देणाऱ्या तीन विदुषी सातासमुद्राच्या पलीकडून भारतात येतात; आणि डॉ. आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांचे जीवनकार्य व चळवळींवर नवाप्रकाश टाकतात. मराठी माणसाने केले नाही असे मूलभूत, ‘पाथ ब्रेकिंग’ आणि शोधाच्या नव्या वाटा उघडणारे काम करतात. एलिनार झेलियट, रोझा ओहेंनलीन आणि डॉ. गेल ऑम्व्हेट याच त्या विदुषी..! त्या मधीलच डॉ. गेल ही अमेरिकन विदुषी  व्हिएतनाम युद्धानंतर तिसऱ्या जगाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून भारतात आल्या आणि महाराष्ट्रातील सामाजिक सांस्कृतिक चळवळीचा अभ्यास करताना त्या या चळवळीत इतक्या एकरूप होऊन गेल्या की, त्या याच देशाच्या नागरिक झाल्या.! याच मातीत विलीन झाल्या!!

‘वासाहतिक काळातील सांस्कृतिक बंड’ या आपल्या पीएच.डी. प्रबंधाची तयारी करण्यासाठी त्यांनी केवळ वाचनच केले नाही तर संबंध महाराष्ट्राचा कानाकोपरा पायाखाली घातला. अनेक खेड्यांना, गावांना, शहरांना भेटी देऊन लहान-मोठे कार्यकर्ते, पुढारी, विचारवंत अभ्यासक, लेखक यांच्या मुलाखती घेतल्या. अनेक जुन्या वृत्तपत्रांच्या फायलींची उलथापालथ केली. महात्मा फुले आणि त्यांच्या ब्राह्मणेतर चळवळींची हजारो कागदपत्रे जमा केली आणि त्याआधारे ‘वासाहतिक काळातील सांस्कृतिक बंड’ हा प्रबंध लिहिला आणि १९७३ मध्ये कॅलिफोर्निया युनिवर्सिटीला सादर केला. परंतु याच काळात त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील जीवन, अभ्यासाच्या निमित्ताने प्रत्यक्ष अनुभवले आणि जगलेही. त्यामुळे पुढील काळात शोषितांची चळवळ आणि त्या चळवळीतील भागीदारी हीच त्यांच्या आयुष्याची दिशा ठरली! विशेषत: महाराष्ट्रातील जनतेशी त्यांचे नाते जुळले आणि पुढचे संपूर्ण आयुष्य या चळवळीत भागीदारी करणे, त्यांचा अभ्यास, व्यासंग, लेखन करणे हाच स्वतःचा जीवनक्रम ठरवत त्या भारतीय बनल्या!

चळवळीत काम करताना कायम सैद्धांतिक आणि व्यावहारिक पेचप्रसंग निर्माण होत असतात. या पेचप्रसंगात सिद्धांत आणि व्यावहारिक दिशा दाखवण्याचे काम डॉ गेल यांनी केले. डॉ. आंबेडकर यांच्या नंतर दलित चळवळीला महत्त्वाच्या टप्प्यावर आणणारे कांशीराम हे डॉ. आंबेडकर यांच्या ‘ॲनिहेलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकाबरोबरच डॉ. गेल यांच्या ‘वासाहतिक काळातील सांस्कृतिक बंड’ या पुस्तकामुळे प्रचंड प्रभावित झाले होते. या पुस्तकाच्या आधारे त्यांनी आपल्या बहुजन समाज पार्टीची सैद्धांतिक भूमिका बनवलेली होती, असे ते म्हणत.

चळवळीत काम करताना कायम सैद्धांतिक आणि व्यावहारिक पेचप्रसंग निर्माण होत असतात. या पेचप्रसंगात सिद्धांत आणि व्यावहारिक दिशा दाखवण्याचे काम डॉ गेल यांनी केले. डॉ. आंबेडकर यांच्या नंतर दलित चळवळीला महत्त्वाच्या टप्प्यावर आणणारे कांशीराम हे डॉ. आंबेडकर यांच्या ‘ॲनिहेलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकाबरोबरच डॉ. गेल यांच्या ‘वासाहतिक काळातील सांस्कृतिक बंड’ या पुस्तकामुळे प्रचंड प्रभावित झाले होते. या पुस्तकाच्या आधारे त्यांनी आपल्या बहुजन समाज पार्टीची सैद्धांतिक भूमिका बनवलेली होती, असे ते म्हणत.

डॉ. गेल यांची पंचवीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून त्यामध्ये प्रामुख्याने ‘कल्चरल रिवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुव्हमेंट इन वेस्टर्न इंडिया’, ‘सिकिंग बेगमपुरा’, ‘बुद्धीझम इन इंडिया’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘महात्मा जोतीबा फुले’, ‘दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन’, ‘अंडरस्टँडिंग कास्ट’, ‘वुई विल स्मॅश दी प्रिझन’, ‘न्यू सोशल मुव्हमेंन्ट इन इंडिया’ या पुस्तकांचा समावेश आहे. डॉ. गेल यांनी देश आणि परदेशात अनेक संशोधन पेपर सादर केले असून शेकडो व्याख्याने दिली आहेत.

भारतामध्ये ‘अस्मितेच्या ओळखीच्या राजकारणाचा’ जेवढा विस्तार झाला आहे आणि अस्मितेच्या राजकारणाचे जे तानेबाने आहेत, त्याबद्दलचे गंभीर चर्चा विश्व उभे करण्यात डॉक्टर गेल यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. डॉ गेल १९८० नंतर वर्ग विश्लेषणाकडून जात विश्लेषणाकडे येतात. ‘मानवी समाजाची समज येणे व त्यावर परिणाम करणे या साठी मार्क्सवाद हे एक अत्यंत अचूक तत्त्वज्ञान आहे’, अशी त्यांची भूमिका होती. १९८० नंतर त्या ‘वर्ग’ विश्लेषणाकडून ‘ जात’विश्लेषणाकडे जातातच पण त्याशिवाय त्यासाठीचा सैद्धांतिक मार्गही निर्माण करत तो अधिक प्रशस्त करतात. जातीचे विश्लेषण करण्यासाठी त्यांना आंबेडकरवाद महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण वाटतो. परंतु याचा अर्थ त्या मार्क्‍सवाद नाकारतात अथवा त्याचा तिरस्कार करतात असा नाही. तर जात-वर्गाच्या विश्लेषणाची, त्याच्या आकलनाची त्या सम्यक चौकट उभी करतात.

स्त्रीमुक्तीच्या संदर्भात विचार करताना जगभर पितृसत्ताया संकल्पनेने जो विचार केला जातो तसा विचार भारतीय स्त्रीमुक्तीच्या संदर्भाने करता येणार नाही. जात धर्माच्या विश्लेषणाशिवाय भारतीय स्त्रीमुक्तीचे सम्यक आकलन होऊ शकत नाही. अशी त्यांची भूमिका होती. म्हणून भारतीय स्त्रीमुक्ती संदर्भात त्यांनी भारताच्या सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासातून पर्यायी धर्म संस्कृतीचा विचार मांडत बुद्धाचा धम्म स्वीकारला.

प्राचीन भारतामध्ये वर्ग होते की नव्हते?: प्राचीन भारतामध्ये वर्ग नव्हते. जात आणि वर्ण आहेत. वर्गाची निर्मिती ही ब्रिटिश भारतात आल्यानंतर झाली, या शरद पाटलाच्या भूमिकेवर जात आणि वर्णाच्या पोटातच वर्ग अंतर्भूत होते, असा तात्विक वाद उभा करत जाती अंतासाठी ‘जात- वर्ग’ संघर्ष उभा करण्याची गरज त्यांनी सांगितली. जातीचा, तिच्या शोषणाचा जो अभ्यास आज जगभरच्या बौद्धिक वर्तुळात केला जातो, आणि गांभीर्याने चर्चा होते, त्यामध्ये डॉ. गेल यांचे महत्त्वाचे योगदान राहfले आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी जातीची चर्चा, तिच्या शोषणाची चर्चा जागतिक केली.

स्त्रीमुक्तीच्या संदर्भात विचार करताना जगभर पितृसत्ता या संकल्पनेने जो विचार केला जातो तसा विचार भारतीय स्त्रीमुक्तीच्या संदर्भाने करता येणार नाही. जात धर्माच्या विश्लेषणाशिवाय भारतीय स्त्रीमुक्तीचे सम्यक आकलन होऊ शकत नाही. अशी त्यांची भूमिका होती. म्हणून भारतीय स्त्रीमुक्ती संदर्भात त्यांनी भारताच्या सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासातून पर्यायी धर्म संस्कृतीचा विचार मांडत बुद्धाचा धम्म स्वीकारला. एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन त्याचा उलगडा कसा करायचा, आणि त्याचे विश्लेषण नि:पक्षपातीपणे कसे करायचे? आणि शोषित समूहाच्या बाजूने बौद्धिक प्रमाणिकता कशी उभी करायची, हेच त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष जीवन व्यवहारातून शिकवले. परिवर्तनाच्या चळवळीला वाहिलेले हे असं डॉ. गेल यांचे जीवन आणि कार्य होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा