अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित नितीन आगे खून खटल्यातून विशेष सरकारी वकिलाची माघार

0
512
संग्रहित छायाचित्र.

अहमदनगरः राज्यभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे या दलित तरूणाच्या खून खटल्यातून विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी माघार घेतली आहे. सत्र न्यायालयात या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटल्यानंतर राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 मार्च रोजी होणार होती. त्याआधीच विशेष सरकारी वकीलांनी माघार घेतली आहे.

 प्रेमप्रकरणाच्या वादातून नितीन आगे या दलित तरूणाची मुलीच्या कुटुंबीयांनी निर्घृण हत्या केली होती. सत्र न्यायालयात अनेक साक्षीदार फितूर झाल्यामुळे या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली होती.या निर्णयाला राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी 15 सप्टेंबर 2018 उमेशचंद्र यादव पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनीच आता वैयक्तिक कारण देऊन या खटल्यातून माघार घेतली आहे. तसे पत्रच त्यांनी राज्याच्या गृहविभागाला आणि आगे यांच्या कुटुंबीयांना पाठवले आहे. त्यामुळे राज्य सरकारला या प्रकरणी नवीन विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा