दिवाळी संपताच औरंगाबादेतील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, एकाच दिवशी आढळले १३८ रुग्ण

0
152

औरंगाबाद:  दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केलेली होती. त्याची प्रचिती औरंगाबादेत येत असून काल एकाच दिवशी औरंगाबाद जिल्ह्यात १३८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४१ हजार ९१४ वर पोहोचली असून आतापर्यंत १ हजार १२४ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवाळीपूर्वी औरंगाबादेतील कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या ५० च्याही खाली  आली होती. मात्र दिवाळी संपताच या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत ११६ तर ग्रामीण भागात २२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, बुधवारी  औरंगाबाद महापालिका हद्दीतील ७२ आणि ग्रामीण भागातील १५ अशा एकूण ८७ कोरोना बाधितांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ४० हजार १६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ६२९ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत.

 महापालिका हद्दीत आढळलेल्या ११६ कोरोना बाधितांमध्ये जालान नगर ३, एन-७ सिडको २, पेशवे नगर, सातारा परिसर १, रचनाकार कॉलनी ८, गोविंद नगर आरटीओ रोड १, गारखेडा व्यकटेश मंगल कार्यालय १, आलोक नहर बीड बायपास परिसर १, गृह निर्माण योजना, शिवाजी नगर १, गणेश नगर दिवाण देवडी १,  सराफा रोड ३, एन-३ सिडको १, वेदांत नगर १, शास्त्री नगर १, मल्हार चौक परिसर १, बालाजी नगर १,   बजाज नगर १, बेगमपुरा १,  स्वप्न नगरी १,  नंदनवन कॉलनी ४, व्यंकटेश नगर २, गारखेडा परिसर १, बीड बायपास ४, म्हाडा कॉलनी १, शुभश्री कॉलनी १, पेठे नगर, भावसिंगपुरा १, पडेगाव ४, मुलांचे वसतिगृह, घाटी  २, मार्ड हॉस्टेल १,  निराला बाजार १,  कांचनवाडी १, बन्सीलाल नगर १, नागेश्वरवाडी १,  बजाज नगर १, दीप नगर, शहानूरवाडी १,  अन्य ५९ रुग्णांचा समावेश आहे.

 ग्रामीण भागात २२ रुग्ण आढळले. त्यात समता नगर, गंगापूर  १, अजंता फार्मा, पैठण एमआयडीसी १, सिडको महानगर, तीसगाव ५, मोहटादेवी चौक् बजाजनगर, वडगाव १, सावरकर कॉलनी, बजाजनगर, वडगाव सिडको १,  मुंडे चौक, जवळ,बजाजनगर ,वडगाव १,  न्यू भारत नगर, रांजणगाव १, शिवाजी नगर, वडगाव २,   फुलेवाडी, वैजापूर १,  बाजाठाण फाटा , वैजापूर १, न्यू हायस्कूल, गणोरी ४, कासोद, सिल्लोड १, अन्य २ रुग्णांचा समावेश आहे.

चार कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटीत रांजणगाव शेणपुंजी येथील ६२ वर्षीय स्त्री, सिद्धार्थ नगर येथील ३२ वर्षीय पुरूष,सिद्धेश्वर नगर, जाधववाडीतील ४८ वर्षीय पुरूष आणि  खासगी रूग्णालयात मयूरबन कॉलनी, शहानूरमियाँ दर्गा जवळील ५३ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा