दहावीचा निकाल ९५.३० टक्के, यंदाही निकालात मुलींचीच बाजी!

0
249
संग्रहित छायाचित्र.

पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एसएससी) म्हणजेच दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल ९५.३० टक्के लागला असून याही वर्षी निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल उशिराने जाहीर करण्यात आला. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणारा निकाल जवळपास दोन महिने उशिराने विद्यार्थ्यांच्या हाती येणार आहे. कोरोनामुळे यंदा दहावीच्या भूगोलाच्या पेपरची परीक्षाही रद्द करावी लागली होती.

नऊ विभागीय मंडळांनी घेतलेल्या दहावीच्या परीक्षेला १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. दुपारी एक वाजेनंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पहायला मिळणार आहे.

येथे पहा तुमचा निकाल

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.mahahsscboard.maharashtra.gov.in

www.mahresult.nic.in

 या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.शाळांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी तारखाः विद्यार्थ्यांना ३० जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान गुणपडताळणीसाठी अर्ज करता येतील.

उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी ३० जुलै ते १८ ऑगस्टदरम्यान अर्ज करता येतील. यासाठी विद्यार्थी-पालकांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. यासाठीचे शुल्कही ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळवले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा