ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ

0
2299
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने बुधवार, ३० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकतील.

 राज्यात एप्रिलमध्ये मुदत संपलेल्या आणि डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सोमवारी सायंकाळपासून तांत्रिक दोष निर्माण झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्याबाबतचे परिपत्रकही जारी केले आहे.

हेही वाचाः ग्रामपंचायत निवडणूकः ऑफलाइन पद्धतीनेही स्वीकारणार जात पडताळणीचे अर्ज

 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना २८ डिसेंबर रोजी सायंकाळपासून इंटरनेटची कमी गती, सर्व्हरच्या अडचणी निर्माण झाल्याच्या तांत्रिक तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या होत्या. इच्छूक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज पारंपरिक पद्धतीने स्वीकारण्याचा तसे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळही ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वाढवली आहे, असे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा