माथाडी कामगारांच्या राज्यव्यापी संपामुळे बाजार समित्यांतील व्यवहार ठप्प

0
45
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः विविध प्रलंबित मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील व्यवहार ठप्प झाले आहेत. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने हा संप पुकारला आहे. या संपामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांतील एक लाखांहून अधिक माथाडी कामगार सहभागी झाले आहेत.

माथाडी मंडळाची पुनर्रचना, कामगारांचे पगार, माथाडी कामगार मंडळातील कर्मचारी भरती या व अन्य १८ प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद आणि अन्य जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील व्यवहारांवर विपरित परिमाण झाला आहे. रेल्वे धक्क्यांवरील व्यवहारही ठप्प झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा