भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक, हा भाजपचाच स्टंटः राष्ट्रवादी

0
455
छायाचित्र सौजन्यः ट्विटर

सोलापूरः भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सायंकाळी सोलापुरात दगडफेक करण्यात आली. घोंडगी बैठकीसाठी सोलापुरात आलेल्या पडळकरांनी आज सकाळीच सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती.

 सायंकीळा पडळकर हे सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरातील एसबीआय कॉलनी येथे आयोजित घोंगडी बैठकीसाठी आपल्या गाडीतून आले होते. त्यावेळी  त्यांच्या गाडीची काच फुटल्याचे लक्षात आले. कुणी तरी अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून गाडीची काच फोडल्याचे सांगण्यात येते.

पडळकरांनी मात्र आपण गाडीत बसल्यानंतर दगडफेक करण्यात आल्याचे म्हटले आहे. मड्डी वस्तीत बैठक झाल्यानंतर गाडीत बसलो आणि काही अंतरावर गेल्यावर गाडीवर दगड फेकण्यात आले. त्यानंतर ते सगळे पळून गेले. पवारांच्या नेतृत्वात राज्यात कशी गुंडगिरी चालते, हे राज्यातील सगळ्या लोकांना माहीत आहे. कुणाला तरी पुढे केले असेल, असे पडळकरांनी म्हटले आहे. दरम्यान, पडळकर यांच्या गाडीची काच फुटल्यानंतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.

…हा तर भाजपने घडवून आणलेला स्टंटः जी घटना घडली, ती कुठल्याही सन्माननीय सदस्याच्या गाडीवर होऊ नये. मात्र हा भाजपने घडवून आणलेला स्टंट आहे. अशा प्रकारचा स्टंट घडवून आणायचा आणि स्वतः प्रकाश झोतात यायचे. मग सुरक्षेची मागणी करायची. शरद पवारांवर ज्या भाषेत टीका करण्यात आली, ती भाषा हलकटपणाची म्हणता येते. हलकटपणाची भाषा करून टीका करून पब्लिसिटी मिळवणाऱ्या भाजपने शहाणपणा शिकवू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टिकास्त्र सोडले आहे.

 काय म्हणाले होते पडळकर?: शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही. तुम्ही कोणी तसे मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे, अशा शब्दांत पडळकरांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत टीका केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा