न्यूजटाऊन इफेक्ट:स्कूलबस चालक, महिला मदतनीसांची चारित्र्य पडताळणी अनिवार्य, अन्यथा कारवाईचा पोलिसांचा इशारा

0
78

औरंगाबाद : औरंगाबादच्या वाळूज परिसरात आठ वर्षीय गतिमं विद्यार्थिनीशी स्कूलबस चालकाने आपल्या मित्रांसह अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याच्या प्रकरणाची पोलिसंनी गंभीर दखल घेतली असू स्कूलबस चालक व मदतनीस महिलांसाठी चारित्र्य पडताळणी बंधनकारक केली आहे. सोमवारी सातारा ठाण्यात स्कूलबस चालक व मदतनीस महिलांची बैठक घेऊन पोलिसांनी नियम पाळा अन्यथा कारईवाला सामोरे जा, असा इशारा दिला आहे.

पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय व खासगी आस्थापनेच्या शाळा आहेत. यापैकी अनेक शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी स्कूलबसचा वापर करतात. काही बसेस या शाळेच्या तर काही बसेस खासगी आस्थापनांकडून करार तत्वावर घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा बसेसवर चालक म्हणून काम करणारे नेमके कोण? याची माहिती शाळेला असली पाहिजे. त्या चालकावर यापूर्वी काही गुन्हे नोंद आहेत का? हेही शाळेने तपासून घेतले पाहिजे, असे आवाहन करत डॉ. खाडे यांनी यापुढे सर्व स्कूलबस चालक आणि मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी अनिवार्यपणे करून घेण्याची सूचना केली. शाळने विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी लावलेली बस त्यांच्यासाठी सुरक्षित आहे की नाही? याची खात्री करावी. सर्वांनी बसमध्ये मदतनीस म्हणून महिलेचीच नियुक्ती करावी, असेही त्यांनी सूचवले. स्कूलबसमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधण्याची सूचनाही त्यांनी केली.

स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही बसवा: स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहनही उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी केले. ज्या शाळांच्या स्वत:च्या बसेस आहेत त्यामध्ये सीसीटीव्ही आहेत,परंतु ज्यांनी खासगी बसेस करारावर मागवलेल्या आहेत त्यात सीसीटीव्ही नसल्याचे समोर आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा