औरंगाबादेतील विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत शाळेत गैरहजर राहण्याची परवानगी!

0
177
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी औरंगाबादेतील विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत शाळेत गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दिवाळी आधीच राज्य सरकारने  इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि दिवाळीनंतर राज्याच्या काही भागात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळा उघडायच्या की नाही याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

दिवाळीपूर्वी औरंगाबाद शहरातील कोरोना बाधितांची संख्या चांगलीच आटोक्यात आली होती. मात्र दिवाळीनंतरच्या तीनच दिवसात ४०४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद शहरातील विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा