मोठी बातमीः विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्या रद्द, एप्रिल महिना आणि रविवारीही भरणार शाळा!

0
607
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुणेः कोरोनाच्या संकटामुळे तब्बल दोन वर्षांच्या लॉकडाऊनमुळे शाळा बंदच राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी यंदाच्या उन्हाळी सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवण्यात येणार असून रविवारीही शाळा सुरू ठेवल्या जाणार आहेत. रविवारी शाळा सुरू ठेवणे मात्र ऐच्छिक असणार आहे. या निर्णयामुळे इयत्ता पहिली ते नववी आणि आकरावीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण एप्रिल महिन्यात वर्गात हजेरी लावावी लागणार आहे.

कोरोनाचे संकट आले आणि देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. प्रारंभी फक्त २१ दिवसांसाठी जाहीर केलेला हा लॉकडाऊन तब्बल दोन वर्षे चालला. लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद ठेवण्यात आल्या. मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यात आले. मात्र ऑनलाइन शिकवण्याचा ना शिक्षकांना सराव, ना विद्यार्थ्यांना सवय; त्यामुळे ऑनालइन शिक्षणाचा पर्याय काही फारसा फलदायी ठरला नाही. त्यातच ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्कची समस्या आणि अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनचाच अभाव असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तर मोठीच आबाळ झाली. परिणामी शाळा आणि परीक्षा दोन्ही ऑनलाइनच झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता राज्यातील कोरोनाचे संकट बऱ्यापैकी आटोक्यात आले आहे. शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत. आता परिस्थिती सामान्य होत चालल्यामुळे अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत होती. त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी सुट्या रद्द करून संपूर्ण एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.

चला उद्योजक बनाः  स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

राज्य सरकारने २४ मार्च रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. कोरोनामुळे जो शैक्षणिक विस्कळितपणा आला आहे, तो दूर करण्याची मागणी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून केली जात होती. विद्यार्थ्यांची भाषा आणि गणितामध्ये पिछेहाट होत असल्याच्याही तक्रारी येत आहेत. त्यामुळे या दोन महिन्यात विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.

राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयानुसार,एप्रिल महिन्यातील उन्हाळी सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. एप्रिल महिनाअखेरपर्यंत शनिवारी शाळा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात. इयत्ता पहिली ते नववी आणि आकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घ्याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावेत. सकाळच्या सत्रात शाळा घेणे आवश्यक असल्यास अध्यापनाच्या तासिका पूर्णवेळ शाळेप्रमाणे घेण्यात याव्यात, असेही या आदेशात म्हटले आहे. शाळेमध्ये दररोज विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीलाही परवानगी देण्यात आल्याचे या शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा