दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार

0
84
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः कोरोनाच्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या दहावी- बारावीच्या पुरवणी परीक्षा नोव्हेंर- डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेच्या तारखा आज जाहीर केल्या. या परीक्षेसाठी २० ऑक्टोबरपासून ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्यास सुरूवात होणार आहे.

विद्यार्थ्यांना २० ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन  आवेदनपत्रे भरता येतील. त्यानंतर ३० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह आवेदनपत्रे भरण्याची मुदत देण्यात आली आहे. ही आवेदनपत्रे शाळा-महाविद्यालयांनी बँक चलनाव्दारे ३ ते ४ नोव्हेंबर या कालवाधी भरायची आहेत.

श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर-डिसेंबर २०२० आणि फेब्रुवारी-मार्च २०१२ अशा दोनच संधी उपलब्ध राहणार आहेत, असे शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा