महाराष्ट्रात पुन्हा रंगणार शंकरपटांचा थरार, सर्वोच्च न्यायालयाने दिली सशर्त परवानगी

0
65
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्रातील शंकरपट म्हणजेच बैलगाडी स्पर्धेबाबत मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातील शंकरपटांवरील बंदी उठवत असल्याचा महत्वाचा निकाल गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा शंकरपटांचा थरार अनुभवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यती म्हणजेच शंकरपट स्पर्धेबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी पार पडली. पशु क्रूरता प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक करण्याच्या अटीवर सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटांवरील बंदी उठवली आहे.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

महाराष्ट्र सरकारने २०१७ मध्ये शंकरपट म्हणजेच बैलगाडी शर्यतीला परवानगी देणारा कायदा संमत केला होता. त्या कायद्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने शंकरपटांना स्थिगिती दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राज्य सरकार आणि पेटाचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालायने महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या खेळावर बंदी आणल्यामुळे शेतकरी नाराज होते. गेली काही वर्षे आम्ही सर्वजण बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करत होते. आजच्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी वर्गाला याचा आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर दिली. शेतकऱ्यांनी अटी-शर्थींचे पालन करून शर्यती भरवाव्यात आणि आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा