ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक

0
113
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः अभिनेता सुशांतसिंग  राजपूतची गर्ल फ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आज अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ८७ व्या दिवशी रियाला ही अटक करण्यात आली आहे.

 गेल्या तीन दिवसांपासून एनसीबीचे पथक रियाची चौकशी करत होते. तिच्या चौकशीच्या तिसऱ्या दिवशी तिला अटक करण्यात आली. सुशांतसिंगचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रिया चक्रवर्तीचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला समन्स बजावून तिची चौकशी केली.

 दरम्यान, रियाला अटक करण्यात आली असली तरी एनसीबीकडून तिची रिमांड मागितली जाणार नसल्याचे सांगण्यात येते. तिला गरजेनुसार चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

आतापर्यंतच्या चौकशीत रियाने आपण कोणतेही ड्रग्ज घेत नसल्याचे सांगितले होते. मात्र सोमवारच्या चौकशीत तिने आपण  सिगारेट आणि मद्यपान करत असल्याची कबुली दिली होती. आपण स्वतः अंमली पदार्थांचे सेवन करत नाही, फक्त सुशांतसाठी अंमली पदार्थ मागवत होतो, असे रियाने एनसीबीच्या चौकशीत सांगितले होते. मात्र मंगळवारी तिने स्वतःही ड्रग्ज घेतल्याचे मान्य केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा