…तर महाराष्ट्रातील मंदिरे पुन्हा बंद होऊ शकतातः भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांचा तुळजापुरात इशारा

0
118
संग्रहित छायाचित्र.

उस्मानाबादः ओमीक्रॉनबाधित रूग्णसंख्या वाढल्यास मंदिरे पुन्हा बंद होऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटले आहे. डॉ. पवार या रविवारी सायंकाळी तुळजापुरात कुलस्वामीनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

ओमीक्रॉनबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने घातलेले निर्बंध सर्व राज्यांसाठी बंधनकारक आहेत. रूग्णसंख्येचा विचार करून लॉकडाऊन लावायचा की नाही हा अधिकार राज्य सरकारचा आहे. नियमांचे व केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन केल्यास अशी वेळ येणार नाही. मात्र महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढल्यास मंदिरे पुन्हा बंद होऊ शकतात, असे डॉ. भारती पवार म्हणाल्या.

ओमीक्रॉन रूग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब या दहा राज्यांत केंद्रीय पथके पाठवली आहेत. या दहा राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे केंद्राने ही पथके पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नव्याने निर्बंधही लागू केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा