हाय अलर्टः मुंबईत अतिरेकी हल्ल्याची शक्यता, ड्रोन किंवा क्षेपणास्त्राद्वारे होऊ शकतो हल्ला

0
135
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः सणासुदीच्या काळात मुंबईत अतिरेकी हल्ल्याचा अलर्ट देण्यात आला असून गर्दीच्या ठिकाणी ड्रोन किंवा क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेला लॉकडाऊन आता टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत असून हळूहळू सर्व गोष्टी खुल्या केल्या जात आहेत. त्यामुळे बाजारपेठात गर्दी होऊ लागली आहे. आता सणासुदीचा काळ असून त्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी ड्रोन किंवा क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला जाऊ शकतो, असा अलर्ट देण्यात आला आहे.

 अतिरेक्यांकडून मुंबईतील गर्दीची ठिकाणे लक्ष्य केली जाऊ शकतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून मुंबईत ३० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर या काळात ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा