पेपरफुटी प्रकरणात २८ जण गजाआड, तब्बल ६ कोटींचा मुद्देमाल जप्तः पुणे पोलिसांची माहिती

0
170
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुणेः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पाच पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत २८ जणांना अटक करण्यात आली असून तब्बल सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात न्यासा या कंपनीचे अधिकारीही सहभागी असल्याची धक्कादायक माहितीही त्यांनी दिली.

आतापर्यंतची पेपरफुटीची पाच प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणात २८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जवळपास ६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या पेपरफुटी प्रकरणांचा तपास सुरू आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

आरोग्य विभागाच्या गट क  व गट ड नोकरभरतीचा पेपर फुटला होता. या पेपरफुटीमध्ये न्यासा या कंपनीचे अधिकारीही सामील होते, असा धक्कादायक खुलासाही गुप्ता यांनी केला आहे. गट डचा पेपर न्याया कंपनीचे अधिकारी बोटले आणि बडगीरे यांच्या माध्यमातून फुटला. हे दोघे एकमेकांशी संबंधित होते का याचा तपास सध्या सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

 गट कचा पेपर फोडण्यात न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत असलेल्या दोन दलालांना अटक करण्यात आली आहे. एका पेपरसाठी हे दलाल पाच ते आठ लाख रुपये घेत होते. न्यासा कंपनीचे वरिष्ठ अधिकारीही यात सहभागी आहेत. पेपर प्रिंट करतानाच न्यासाच्या अधिकाऱ्यांनी तो फोडला, अशी माहीतीही गुप्ता यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा