टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे जालन्यापर्यंत, प्रा. सुनील कायंदे यांच्या घरी धडकले गुन्हे शाखेचे पथक

0
297
प्रातिनिधिक छायाचित्र.

जालनाः टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे जालना जिल्ह्यापर्यंत पोहोचले असून पुणे गुन्हे शाखेचे पथक प्रा. सुनील कायंदे यांच्या घरी धडकले आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर टीईटी पेपरफुटीचे प्रकरण पुढे आहे. या प्रकरण पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने काल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना त्यांच्या पिंपरी चिंचवड येथील घरातून अटक केली होती.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

 आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना पुणे पोलिसांच्या सायबर शाखेला म्हाडा पेपरफुटीची माहिती मिळाली होती. म्हाडा परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात जीए सॉफ्टवेअर कंपनीचा डॉ. प्रीतीश देशमुख व अन्य दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली होती. देशमुख याच्या घराच्या झडतीत टीईटीच्या परीक्षार्थींची हॉल तिकिटे सापडली होती. त्याचवेळी टीईटी परीक्षेचेही पेपर फुटल्याचा संशय वाढला होता.

 सुपे यांच्या अटकेनंतर राज्यात खळबळ उडाली असतानाच जालन्यातील प्राध्यापक सुनील कायंदे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या व्हायरल क्लिपनंतर टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे जालना जिल्ह्यापर्यंत पोहोचले असल्याची चर्चा सुरू झाली असतानाच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक आज सकाळी प्रा. सुनील कायंदे यांच्या जालन्यातील घरी धडकले. वाटूर फाट्यावर कायंदे यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

असा व्हायचा टीईटी परीक्षेत गैरव्यवहार

टीईटी परीक्षेच्या वेळी तुम्ही ओएमआर शीट्स भरू नका, असे उमेदवारांना सांगितले जायचे. स्कॅनिंगच्या वेळी त्यांची ओएमआर शीट भरली जायची. यातही काही उमेदवार राहिले असतील तर तुम्ही रिचेकिंगसाठी अर्ज करा, असे सांगितले जायचे. रिचेकिंगसाठी अर्ज आल्यानंतर त्यांच्या पेपरमध्ये गैरप्रकार केले जायचे. या उमेदवारांकडून पूर्वपरीक्षेसाठी ३५ हजार ते १ लाख रुपये घेतले जायचे, असा प्राथमिक अंदाज आहे. मुख्य परीक्षेत हा रेट आणखी वाढायचा. टीईटी परीक्षेतील हा गैरप्रकार जानेवारी २०२० मध्ये झालेल्या परीक्षेच्या वेळचा आहे. आणखी कोणकोणत्या परीक्षेच्या वेळी गैरप्रकार झाले, याचा तपास आता पोलिस करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा