भाजपप्रणित एनडीए सरकारच्या काळातील संरक्षण खरेदी भ्रष्टाचारात जया जेटलींसह तिघे दोषी

0
387
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या कालात १९ वर्षापूर्वी झालेल्या संरक्षण खरेदीतील भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने समता पार्टीच्या  माजी अध्यक्षा जया जेटलींसह तिघांना दोषी ठरवले आहे. २००१ मध्ये देशात भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचे सरकार होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि समता पार्टी एनडीएचा घटक पक्ष होता. त्यावेळी ‘ऑपरेशन वेस्ट एंड’ नावाने तहलका डॉट कॉमने केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे भ्रष्टाचाराचे हे प्रकरण उघडकीस आणले होते.

हेही वाचाः राम मंदिराचे ई-भूमिपूजन करू शकत नाही का?: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सवाल

तहलका डॉट कॉमने २०००-२००१ दरम्यान हे स्टिंग केले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आहे. विशेष सीबीआय न्यायमूर्ती वीरेंद्र भट यांनी जया जेटली, त्यांच्या पक्षाचे तत्कालीन सहकारी गोपाल पचेरवाल आणि सेवानिवृत्त मेजर जनरल एस.पी. मुर्गई यांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने या तिघांनाही भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यातील कलमान्वये गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या प्रकरणात किती शिक्षा द्यायची याबाबत २९ जुलै रोजी युक्तीवाद केला जाणार आहे.

हेही वाचाः सरकार पाडायचे तर जरूर पाडा, फोडाफोडी करून बघाः मुख्यमंत्री ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान

तहलकाच्या टीमने सहा महिने मेहनत घेऊन केलेल्या ‘ऑपरेशन वेस्ट एंड’ स्टिंगमध्ये तहलकाचे दोन पत्रकार शस्त्रास्त्रांचे विक्रेते बनून अनेक बडे राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच देताना आणि संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक गोपनीय रहस्यांबाबत खुल्लमखुल्ला बातचीत करताना दाखवले होते. या ऑपरेशनमद्ये भाजपचे तत्कालीन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण हेही एक लाख रूपयांची लाच स्वीकारताना एका फुटेजमध्ये आढळून आले होते. त्यामुळे त्यांना पक्षाध्यक्षपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा