दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, दोन सत्रांत होणार ऑफलाइन परीक्षा

1
608
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान होणार आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १.३० आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ अशा दोन सत्रांत ही परीक्षा होणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीची परीक्षा होणार की नाही आणि झाली तर ती ऑफलाइन होणार की ऑनलाइन असे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना भेडसावत होते. दोन सत्रात होणारी ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत बेवसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे या परीक्षेवरही अनिश्चिततेचे सावट आहे. दहावी- बारावीच्या परीक्षांना आणखी महिनाभराचा अवधी असल्यामुळे परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण तीन दिवसांआधी मंडळाच्या वतीने देण्यात आले होते.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा