टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने जिंकले कांस्यपदक!

0
30
छायाचित्रः ट्विटर

टोकियोः भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक जिंकून दिले आहे. सिंधूने चीनच्या बिंग जिओ हिचा पराभव करून कांस्यपदकावर आपले नाव कोरले. सिंधूचे हे दुसरे ऑलिम्पिक पदक आहे. याआधी तिने रिओ  ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने आज जिंकलेल्या पदकाबरोबरच भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या एकूण पदकांची संख्या तीन झाली आहे.

बिंग जिओविरुद्धच्या सामन्यात सुरूवातीपासूनजच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर १६-१०, १९-१२ अशी आघाडी कायम टिकवली. सिंधूने पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही तिने चांगली सुरूवात केली आणि ५-२ अशी आघाडी घेतली. पहिला गेम गमवाल्यानंतर बिंग जिओ दबाखाली असल्याचे दिसून येत होते.

 दुसऱ्या गेममध्ये चीनच्या बिंग जिओने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र सिंधूने कमी चुका करून आघाडी कायम राखली आणि जिओने पुन्हा ११-११ अशी बरोबरी साधली खरी, परंतु सिंधूने १६-१३ अशी आघाडी वाढवली आणि २१-१५ अशा फरकाने कांस्यपदक जिंकले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा