भारतात ब्रिटनच्या नव्या कोरोनाचे २० रुग्ण, वेगाने संसर्ग फैलावण्याची भीती

0
60
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनने बाधित झालेले १४ नवीन रुग्ण भारतात आढळून आले आहेत. त्यामुळे या कोरोनाने बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेला नव्या प्रकारचा हा कोरोना विषाणू वेगाने फैलावतो. त्यामुळे भारत सरकार आता मागील एक महिन्यात ब्रिटनहून भारतात परतलेल्या ३३ हजार लोकांचा शोध घेणार आहे.

एकीकडे भारतात जुलै महिन्यानंतर आता सर्वात कमी कोरोना बाधित रुग्ण आढळून येऊ लागले असतानाच या नव्या प्रकारच्या कोरोनाने देशाची चिंता वाढवली आहे. या कोरोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. ब्रिटनहून भारतात येणाऱ्या विमानांवर घालण्यात आलेली बंदी आता ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात देशात लसीकरण मोहीम राबवण्याची तयारी केली जात असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या प्रकारच्या कोरोनाने बाधित झालेले रुग्ण आढळून येऊ लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे.

गेल्या २४ तासांतच देशात ब्रिटनच्या नव्या कोरोनाने बाधित झालेले १४ रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी मंगळवारी ६ रुग्ण आढळून आले होते. आढळून आलेल्या रुग्णांत सर्वाधिक रुग्ण दिल्लीचे आहेत. त्या पाठोपाठ बेंगळुरूच्या प्रयोगशाळेत पाठवलेले ७ नमुने या नव्या कोरोनाने बाधित आढळले आहेत.

प्रयोगशाळापॉझिटिव्ह नमुने
एनसीडीसी, दिल्ली
एनआयएमएएनएस, बेंगळुरू
सीसीएमबी, हैदराबाद
एनआयबीसी, कल्याणी ( प. बंगाल)
एनआयव्ही, पुणे
आयजीआयबी, दिल्ली
एकूण२०

 कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन केलेल्या नॅशनल टास्क फोर्सने ब्रिटनहून परत येणाऱ्या नागरिकांव्यतिरिक्त सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात आढळून येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५ टक्के पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वॅब जिनोम स्विक्वेंसिंगसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांपूर्वीच नॅशनल टास्क फोर्सने नव्या प्रकारचा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तयार केलेली योजना जाहीर केली होती.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नव्या प्रकारचा कोरोना ७० टक्के जास्त संसर्ग फैलावणारा असल्यामुळे ब्रिटनमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेला स्ट्रेन जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे आपली लोकसंख्या लक्षात घेता आपणाला जास्तीची खबरदारी घ्यावी लागणार आहे, असे भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी म्हटले आहे.

प्रवाशी शोधण्याचे मोठे आव्हानः ब्रिटनमधून भारतात परतलेल्या लोकांचा शोध घेणे हे सरकारी यंत्रणेपुढील मोठे आव्हान असणार आहे. ब्रिटनहून पुण्यात परतलेल्या १०९ लोकांचा अद्याप शोध लागलेला नाही. ओडिशामध्येही ब्रिटनहून परतलेले ७४ प्रवासी बेपत्ता आहेत. आंध्र प्रदेशात ब्रिटनहून परतलेल्या १ हजार ४२३ प्रवाशांपैकी १ हजार ४०६ प्रवाशांचाच शोध लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा