महानगरपालिका, नगरपरिषदांतील नगरसेवकांच्या संख्येत वाढ; वाचा कुठे वाढणार किती नगरसेवक?

0
316
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढवण्याची गरज लक्षात घेऊन २६ महानगरपालिका व सर्व नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुंबई महानगरपालिकेतील सध्याची २२७ ही नगरसेवक संख्या मात्र कायम असेल.

सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान १७ सदस्य व कमाल ६५ इतकी आहे. महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे २०२१ च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत  लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरुन अधिनियमात नमुद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत १७ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्या देखील वाढेल व त्यामुळे पर्यांप्त सदस्य संख्या निश्चित होईल.

महानगरपालिकांमध्ये ३ लाखांपेक्षा अधिक व ६ लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ७६ व अधिकत्तम संख्या ९६ पेक्षा अधिक नसेल.

६ लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ९६ व अधिकत्तम संख्या १२६ पेक्षा अधिक नसेल.

१२ लाखांपेक्षा अधिक व १४ लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १२६ व अधिकत्तम संख्या १५६ पेक्षा अधिक नसेल.

२४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १५६ व अधिकत्तम संख्या १६८ पेक्षा अधिक नसेल.

३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १६८ व अधिकत्तम संख्या १८५ पेक्षा अधिक नसेल.

अ वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या ४० व अधिक संख्या ७५ हून अधिक नसेल.

ब वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २५ व अधिक संख्या ३७ हून अधिक नसेल.

क वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २० व अधिक संख्या २५ हून अधिक नसेल.

कोणत्या महापालिकेत किती वाढणार नगरसेवक?:

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे  राज्यातील महानगरपालिकांतील वाढीव नगरसेवक संख्या पुढील प्रमाणे असेल (कंसात सध्याची नगरसेवक संख्या)- पुणे-१७३ (१६२), नागपूर-१५६ (१५१), औरंगाबाद-१२६ (११५), ठाणे-१४२ (१३१), पिंपरी-चिंचवड-१३९ (१२८), नाशिक-१३३ (१२२),  कल्याण डोंबिवली-१३३ (१२२), नवी मुंबई-१२२ (१११), वसई विरार-१२६ (११५), अमरावती-९८ (८७),  परभणी-७६ (६५),  चंद्रूपर-७७ (६६),  अहमदनगर- ७९ (६८), लातूर- ८१ (७०),  धुळे-८५ (७४), जळगाव-८६ (७५), सांगली-मिरज- कुपवाड- ८९ (७८), उल्हासनगर-८९ (७८), पनवेल- ८९ (७८), अकोला-९१ (८०), कोल्हापूर-९२ (८१), नांदेड- वाघाळा-९२ (८१), मालेगाव-९५ (८४), भिवंडी-निजामपूर-१०१ (९०), मिरा-भाईंदर-१०६ (९५) आणि सोलापूर- ११३ (१०२).

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा