फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंगची सहा आठवड्यांत चौकशी : गृहमंत्र्यांची घोषणा

0
172
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः फडणवीस सरकारच्या काळात फोन टॅपिंगचा गैरवापर झाल्याच्या असंख्य तक्रारी राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून गृह विभागाला प्राप्त झाल्या असून या प्रकरणाची दोन सदस्यीय समितीमार्फत सहा आठवड्यांत सर्वंकष चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

मागच्या सरकारच्या काळात फोन टॅपिंग प्रकरणाचा गैरवापर झाल्याच्या असंख्य तक्रारी अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. सत्तेचा हा गैरवापर भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या स्वातंत्र्य आणि खासगीपणाच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा असून राष्ट्रीय सुरक्षेला धोकाही आहे. त्यामुळे या प्रकरणाची सहा आठवड्यांत गृह विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव श्रीकांत सिंग आणि गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांच्या दोन सदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा देवेंद्र फडणवीस सरकारवर आरोप आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचे नाट्य सुरू असताना फडणवीस सरकारने हे फोन टॅपिंग केल्याचे सांगितले जाते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा