नवा ट्विस्टः धनंजय मुंडेंवर आरोप करणारी महिला हनी ट्रॅपमध्ये अडकवणारी, भाजप नेत्याची तक्रार

0
622
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपाला वेगळेच वळण लागले असून राष्ट्रवादीच्या या नेत्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप करणारी ती गायिका महिला हनी ट्रॅपमध्ये अडकवणारी असल्याची तक्रार मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आंबोली पोलिसांत दाखल केली आहे. रेणू शर्मा ही हनी ट्रॅप लावून प्रतिष्ठित व्यक्तींना ब्लॅकमेल करणारी असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी हेगडे यांनी केली आहे. हेगडे यांच्या तक्रारीमुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेतेही अडचणीत आले आहेत.

 रेणू शर्मा ही महिला २०१० पासून माझ्या लागली होती. तिच्याशी संबंध ठेवावेत म्हणून ती मेसेज करत होती. माझा पाठलाग करत होती. तब्बल पाच वर्षे ती मला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. ९९८११११११२, ९८९२८१४७८, ०२२६६९३४४४४, ८४५४८०२२०८ या क्रमांकावरून तिने मला कॉल केले. मी तिच्याबद्दल माहिती घेतली असता ती एक लबाड महिला असल्याचे मला समजले. त्यानंतर मी तिला पूर्णपणे भेटायचे टाळले. तिला तसे स्पष्ट बजावून सांगितले होते, असे हेगडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

 तिने काही पुरूषांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे मला समजले. या महिन्याच्या ६ आणि ७ तारखेला तिने ८८२८२६५२८९ या क्रमांकावरून मला व्हॉट्सअप मेसेज केला. तुम्ही मला विसरलात का?,  असा तो मेसेज होता. मी थम्ब इमोजी पाठवण्यापलीकडे तिला प्रतिसाद दिला नाही, असेही हेगडे या तक्रारीत म्हणतात.

दोन दिवसांपूर्वी रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर मला धक्काच बसला. तेव्हाच मी तिच्याविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला. आज तिने मुंडे यांना टार्गेट केले. कदाचित दोन वर्षांपूर्वी माझ्यावर हीच वेळ आली असती. उद्या कदाचित दुसरा कुणी त्या जागी येईल. त्यामुळे या महिलेविरुद्ध एफआयआर दाखल करून तिची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही हेगडे यांनी तक्रारीत केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा