युक्रेन-रशिया युद्धः संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांच्या फौजा युक्रेनच्या मदतीला,युद्धाचा आवाका जागतिक

0
206

कीव्हः रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी हल्ल्याचे स्वरुप आता व्यापक होऊ लागले आहे. या युद्धाचे स्वरुप आता केवळ द्विपक्षीय न राहता जागतिक होऊ लागले असून संयुक्त राष्ट्राच्या २८ सदस्य राष्ट्रांनी युक्रेनला युद्धविषय मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांच्या फौजा आता युक्रेनच्या मदतीला तैनात होणार आहेत. दुसरीकडे अमेरिकेनेही रशियाच्या विरोधात युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि फौजांची मदत देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे युक्रेन-रशियातील या युद्धाला आता एक मोठे वळण मिळाले आहे. जगाने आता दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धासाठी तयार रहावे, असे सांगत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गंभीर इशारा दिला आहे.

 बलाढ्य रशियाने हल्ला केल्यानंतर इवल्याशा युक्रेनने रशियासमोर गुडघे टेकण्यास नकार दिला आहे. युक्रेनची राजधानी कीव्हवरील रशियाच्या हल्ल्याचा शनिवारी तिसरा दिवस उजाडला. रशियन फौजा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. कीव्हमध्ये रशियाच्या क्षेपणास्त्रांनी एका अत्त्युच्च रहिवासी इमारतीला लक्ष्य केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मृतांची आकडेवारी मात्र अद्याप बाहेर आलेली नाही.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर जगभरातील देश आता युक्रेनच्या बाजून एकजूट होताना पहायला मिळत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या २८ सदस्य देशांनी युक्रेनला युद्धविषयक मदत करण्यास सहमती दिली आहे. त्यामुळे रशिया- युक्रेन युद्धाची व्यापकता वाढताना पहायला मिळत आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी रशियाला इशारा देतानाच जगभरातील देशांनाही सतर्क राहण्यास बजावले आहे. जगाने आता दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धासाठी तयार रहायला हवे. युक्रेनमधील युद्ध आता बरेच वाढणार आहे, असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. मॅक्रॉन यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात युक्रेनच्या बाजूने उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. युक्रेनला शक्य ती सर्व मदत करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. या युद्धामुळे आणि त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या पेचप्रसंगांमुळे दूरगामी परिणामी होतील, असेही मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

शस्त्रे टाकण्यास युक्रेनचा नकारः रशियन फौजांकडून भयंकर बॉम्बहल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू असतानाच युक्रेनचे अध्यक्ष वोलीदीमीर झेलेन्स्की यांनी आम्ही शस्त्रे टाकून शरणागती पत्करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आम्ही आमच्या भूभागाचे रक्षण करण्याची लढाई लढत राहू. मी आमच्या सैन्याला शस्त्रे खाली टाकण्यास सांगितल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की, युक्रेन आमचा भूभाग आहे, हा आमचा देश आहे, आमची मुले आहेत आणि आम्ही त्याचे रक्षण करू, असे झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या ताज्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा