रशिया- युक्रेन युद्धः तत्काळ युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनपुढे ठेवल्या ‘या’ चार अटी…

0
381
संग्रहित छायाचित्र.

कीव्ह/मॉस्कोः युक्रेनमध्ये रशियन फौजांनी मंगळवारी बॉम्बहल्ले वाढवले असून त्यामुळे अन्न, पाणी आणि औषधाच्या तुटवड्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. हे युद्ध सुरूच असताना सोमवारी युक्रेन आणि रशियादरम्यान चर्चेची तिसरी फेरी झाली. या चर्चेत रशियाने युक्रेनपुढे चार अटी ठेवल्या असून या अटी मान्य केल्या तर युद्ध लगेच थांबवण्याची तयारी रशियाने दाखवली आहे. दरम्यान, १० मार्च रोजी रशिया आणि युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांची तुक्रीमध्ये बैठक होणार असून तुक्रीने या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे.

 रशियाने युक्रेनपुढे ठेवलेली पहिली अट लष्करी कारवाई थांबवण्याबाबतची आहे. आम्ही खरोखरच युक्रेनवरील लष्करी कारवाई पूर्णतः थांबवण्यास तयार आहोत. परंतु त्यापूर्वी युक्रेनने रशियन फौजांविरुद्धची आपली लष्करी कारवाई थांबवली पाहिजे. युक्रेनने लष्करी कारवाई थांबवली तर रशियन फौजा गोळीबार करणार नाहीत, असे रशियन प्रवक्त्याने म्हटले आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 या चर्चेदरम्यान रशियाने युक्रेनसमोर ठेवलेली सर्वात महत्वाची दुसरी युक्रेनने आपल्या संविधानात दुरूस्ती करण्याची आहे. युक्रेनने आपल्या संविधानात अशी दुरूस्ती करावी की ज्यामुळे युक्रेन तटस्थ राहील आणि कोणत्याही गटात सहभागी होणार नाही. तिसऱ्या अटीमध्ये क्रिमियाला रशियन प्रदेश म्हणून मान्यता देण्याची आहे. युक्रेनने क्रिमियाला बिनाशर्त रशियन प्रदेश म्हणून मान्यता द्यावी, अशीही अट रशियाने युक्रेनपुढे ठेवली आहे.

 डोनेस्तक आणि लुगान्स्क ही स्वतंत्र राष्ट्रे आहेत, हे युक्रेनने मान्य करावे आणि या दोन्ही प्रदेशांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची अटही रशियाने युक्रेनपुढे ठेवली आहे. या दोन्ही प्रदेशांना युक्रेनने स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिल्यास हे युद्ध आम्ही लगेचच थांबवू असे रशियाने या चर्चेदरम्यान म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

अकडून पडलेल्या नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी रशियाची मानवी कॉरिडॉरची घोषणाः दरम्यान, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे म्हणून सोमवारी रशियाने तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आणि सुरक्षित मानवी कॉरिडॉर स्थापन करणार असल्याचेही जाहीर केले. परंतु रशियाने जाहीर केलेल्या स्थलांतराचे बहुतांश मार्ग हे रशिया आणि त्याचा मित्र बेलारूसकडे जाणारे असल्यामुळे रशियाच्या या निर्णयावर युक्रेनबरोबरच अन्य राष्ट्रांनीही टीका केली आहे. भारतातील रशियन दूतावासाने मानवी कॉरिडॉरची यादी जाहीर केली आहे. या यादीत युक्रेनच्या सुमी शहरातून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी बनवण्यात आलेल्या सुरक्षित मानवी कॉरिडॉरचाही समावेश आहे. सुमी शहरात अद्यापही ६०० भारतीय विद्यार्थी अडकून पडलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करूनही त्यांचे स्थलांतर करण्यास यश येऊ शकलेले नाही. सुमी शहरातून दोन रस्त्यांनी अकडून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढले जाईल. तेथून विमान, रस्ते किंवा रेल्वे मार्गे त्यांना पुढे जाता येईल, असे भारतातील रशियन दूतावासाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा