राज्यातील राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात, रावसाहेब दानवेही कोरोना पॉझिटिव्ह

0
94
संग्रहित छायाचित्र.

जालनाः  कोरोनाच्या सध्याच्या लाटेने राज्यातील राजकीय नेत्यांभोवती विळखा आवळला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक नेते, मंत्री, आमदार, खासदारांना कोरोनाची लागण झाली असून त्यात आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचाही समावेश झाला आहे. दानवे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनच ही माहिती देण्यात आली आहे.

 दानवे यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रावसाहेब दानवे हे सध्या विलगीकरणात आहेत. संपर्कात आलेल्यांनी तत्काळ चाचणी करावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन दानवे यांनी केले आहे. दानवे हे सध्या जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

हेही वाचाः महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेकः ४०,९२५ नवे रूग्ण, २० मृत्यू; सक्रीय रूग्णसंख्या दीड लाखांच्या आसपास!

 गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी राज्यात ४० हजार ९२५ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या या लाटेने राज्यातील राजकीय नेत्यांना कवेत घेतले आहे. महाराष्ट्रातील जवळपास ७० आमदार, १५ मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

हेही वाचाः  पुरूषोत्तम ‘अर्थ’शास्त्रः ना पदासाठी अर्ज, ना मुलाखत पत्र; तरीही देशमुखांची अधिव्याख्यातापदी नियुक्ती!

 कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार रोहित पवार, प्रताप सरनाईक आदींचा समावेश आहे.  हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

विशेष म्हणजे मंत्र्यांची कार्यालयेही कोरोनाच्या विळख्यात सापडली असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील २१ तर मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील २२ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा