मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात आज आणि उद्या मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता

0
255
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणात काही ठिकाणी आज आणि उद्या (१९ आणि २० नोव्हेंबर) अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या सर्वच भागातील सरासरी तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडी जाणवते मात्र १२ नोव्हेंबरपासून रात्रीच्या सरासरी तापमानात सासत्याने वाढ होत असून गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडी गायब झाली आहे. राज्यात ८ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेला तापमानाचा पारा आता १७ ते २० अंश सेल्सिअसवर गेला आहे.

 सध्या अरबी समुद्राच्या दक्षिण-पश्चिम आणि पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शेतकऱ्यांना सूचनाः काही ठिकाणी वीजांचा कडकडाटही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि शेतमाल कोरड्या जागेत नेऊन ठेवावा, अशा सूचनाही हवामान विभागाने दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा