पॅकेज असावे तर असेः अमेरिकेचे ६६३ लाख कोटींचे पॅकेज, बेरोजगारांना दरमहा ८८ हजार रुपये भत्ता

0
176
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः कोरोना निर्मूलन आणि अर्थव्यवस्था सावरण्यासाठी तब्बल ९०० अब्ज डॉलर म्हणजेच ६६३ लाख कोटींचे आर्थिक जम्बो पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजअंतर्गत बेरोजगारांना दरआठवड्याला ३०० डॉलर म्हणजेच महिन्याला जवळपास १२०० डॉलर (भारतीय रुपयांत ८८ हजार रुपये) भत्ता दिला जाणार आहे. ग्राहकांची क्रयशक्ती वाढवून बाजारपेठेला चालना देणे हा या आर्थिक पॅकेज मागचा मूळ हेतू आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला विकासदर खुंटला आहे. व्यापार ठप्प झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारी झपाट्याने वाढत चालली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत आणि लाखो लोकांना कोरोनाच्या संसर्गामुळे जीव गमावावा लागला आहे.

या ९०० अब्ज डॉलरच्या पॅकेजमधून बेरोजगार, गरजू नागरिक, छोटे उद्योजक, शाळा, आरोग्यसेवा पुरवठादार यांना थेट आर्थिक मदत केली जाणार आहे. हे पॅकेज अमेरिकन नागरिकांना सावरण्यासाठी फायदेशीर ठरेल, असे सिनेटचे ज्येष्ठ नेते एम. मॅकवेल यांनी म्हटले आहे.

नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी महिनाभरात अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून सरकारच्या मदतीची वाट पाहत बसलेले छोटे व्यावसायिक, बेरोजगार आणि गरजू नागरिकांसाठी हे आर्थिक पॅकेज संजीवनी ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा